भुताच्या भयानक कथा | भयानक कथा| गूढ कथा| गूढ रहस्य कथा|

नमस्कार मित्रांनो  पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक कथा घेऊन आलो आहे .भुताच्या भयानक कथा | भयानक कथा| गूढ कथा| गूढ रहस्य कथा|

भुताच्या भयानक कथा | भयानक कथा| गूढ कथा| गूढ रहस्य कथा|


कर्र्र कर्र्र ....हलणाऱ्या आराम खुर्चीचा आवाज बेडरूममधे घुमत होता. त्यावर शशिकला मागेपुढे आरामात हेलकावे घेत होत्या भिंतीवरच्या भल्यामोठ्या घड्याळात बारा वाजून पाच मिनीट झाली होती बंगल्यात अंधार होता.शशिकला बाईंची नजर त्यांच्या भिंतीवरच्या फोटोवर होती. लग्नानंतर काही दिवसांनी हा फोटो काढला होता हातात हिरवाचूड़ा , गळ्यात दागदागिने ,डोक्यावर घेतलेला पदर चेहऱ्यावर तजेल कांती त्यांना आपले पूर्वीचे दिवस आठवत होते. नवरा बायको एक मुलगा एक मुलगी असं चौकोनी कुटुंब. नवऱ्याच अकाली निधन झालं पण डगमगता हिम्मतीने शशिकला बाईंनी पुढे व्यवसाय चालवला मूल मोठी झाली त्यांची लग्न केली ती परदेशात गेली आणि तिथेच स्थायिक झाली. त्या नंतर शशिकला बाई एकट्या पडल्या त्या पडल्याच मागे एकदा जिन्यावरुन घसरुन पडल्या डोक्याला खोच पडून रक्तही फार गेलं पण मदतसुध्दा वेळेवर भेटली नाही . तो बंगलाही मुख्य रस्त्यापासून , रहदारीपासून लांब त्या मुळे सगळीकडे नीरव शांतता... अंगणात काही खुडबुड झाली. शशिकलाबाई हळुवार चालत खिडकीपाशी आल्या कंम्पाउंड वॉलच्या बाजूला दोन तीन सावल्या वळवळताना दिसत होत्या कोणीतरी वॉलवर चढण्याचा प्रयत्न करत होतं एकाने वॉलवर चढून आत उडी मारली वयाने मध्यमसा क्रुश शरीरयष्टी ,अंगात बंडी धोतर , डोक्यावरुन घेतलेलं कांबळ आणि एका हातात पहार कडी उचकटण्यासाठी कदाचित तो चोर होता .त्याच्या पाठोपाठ त्याच्या दोन साथीदारांनेही उडी मारली .त्या दोघांची शरीरयष्टी पहिल्याच्या सारखीच.. दुसऱ्याच्या हातात लांब लचक बॅटरी आणि तिसऱ्याच्या कमरेला मात्र धारदार कोयता लटकत होता .
त्यातला पहिला बोलला "नाऱ्या काढ बा लवकर एक एक घोट मारू "
नाऱ्याने आपल्या बंडीच्या खिश्यातुन चपटी काढली त्याचा एक घोट घेऊन हनम्याकडे फिरवली .
हनम्या :सर्ज्या खबर पक्की हाय ना घरात कोनबी नाय ते ?
सर्ज्या :न्हाय रे कोनबी नाय
"आणि आसलच तर काय करायच ते बी आपल्याला माहितीच हाय की "सर्ज्या आपल्या कमरेवरच्या कोयत्यावर हात फिरवत बोलला ."चला कामाला लागा "त्यांच्या कुजबुजण्याचे आवाजवर शशिकला बाईपर्यंत थोडेफार ऐकु आले .आजकाल आसपासच्या परिसरात चोरी ,दरोडे वाढले होते .
शशिकलाबाई आपल्या खुर्चीवर येऊन बसल्या त्यांच्या बेडरूमचा दरवाजा बंद होता .शांततेत आवाज चांगले ऐकु येत होते .हॉलच्या खिडकीचा बोल्ट खटकन तुटल्याचा आवाज झाला त्या बरोबर खिडकीचे दरवाजे खाडकन उघडले एकेक करत तिघांचेही पावलंचे आवाज फरशीवर उमटले .तिघांची पावले हॉलभर फिरत होती इतक्यात कोणाचातरी धक्का लागून कोपऱ्यातला फ्लॉवरपॉट खाली पडला खळकन फुटला ...."हनम्या बैला एक दिस तूझ्यामुळे आमचाबी जीव जाणार हाय "सर्ज्याचा आवाज हॉलमधे घुमला .एकाने हॉलमधल्याच बेडरूमचा दरवाजा खोलल्याचा आवाज आला तिघेही आत आले आत पलंग ,एक टेबल दोन खुर्च्याशिवाय काही नव्हतं तिघांनी पलंगाचे कप्पे उघडून बेड उलटा पालटा करून पहिलं तिथे काही नव्हतं .तिघेही एक एक करून बाहेर आले समोरच्या रूमकडे वळले पण तिथे काय मिळण्याची शक्यता नव्हती कारण तिथल फर्निचरही केव्हाच हलवल होतं .तिघेही वरच्या मजल्यावर जायला पायऱ्यावर चढू लागले .जिन्याला सफेद रंगाच्या टाइल बसवल्या होत्या त्यावर लाल रंगाचे पुसटसे रक्ताचे डाग होते कधी काळी पडलेले पण नीट पुसल्याने तसेच राहिले होते .तिघेही एका मागोमाग एक पायऱ्या चढत वरच्या मजल्यावर आले .शशिकला बाईंच्या बाजूच्या बेडरूमच्या दरवाजा पर्यंत येऊन पोचले .दरवाजाचीकडी वर खाली फिरवण्याचा आवाज आला दरवाजा लॉक होता नंतर दोन तीन वेळा दरवाजावर जोरात धक्के दिले गेले आणि तो बाजूच्या बेडरूमचा दरवाजा धाडकन उघडला. तिघे आत आले पूर्ण रूममधे बॅटरी मारली कोपऱ्यात एक कपाट होतं ते त्या कपाटाजवळ आले .हनम्याने हातातली पहार कपाटाच्या दोन दाराच्या फटीत घुसवली आणि रात्रीच्या शांततेत दरवाजा पेचण्याचा आवाज येऊ लागला. कपाट जुनं होतं पण मजबूत होतं .तिघांनी जोर लावल्यानंतर दरवाजा तुटून बाजूला पडला पण कपाटही पूर्ण खाली होतं त्यात काहीच नव्हतं .
नाऱ्या :आरं पूर घर शोधल काय बी नाय कस ?
सर्ज्या :न्हाय रे इतका मोठा बंगला असा खाली कसा असल ?
शशिकला बाईंच्या बेडरूममधून पुन्हा खुर्चीचा कर्र कर्र आवाज येऊ लागला तो आवाज ऐकून सर्ज्याच्या डोक्यात प्रकाश पडला .
"आरं बाजूची खोली तर बघायचीच राहिली "सर्ज्या त्या दोघांकडे पाहत पुटपुटला ते दोघे बाकीचे ड्रॉवर धुंडाळण्यात बेड उलट पालट करण्यात व्यस्त होते म्हणून सर्ज्या एका हातात बॅटरी घेऊन एकटाच निघाला .
त्यांच्या हालचालींचे आवाज शशिकला बाईंच्या रूमपर्यंत सहज येत होते. बाजूच्या रूममधे तिघेजण घुटमळत होते पण त्यातल्या एक बाहेर आला होता आणि त्यांच्या रूमच्या दिशेने येत होता. त्याच्या पावलंचा आवाज रूमच्या दरवाजासमोर येऊन थांबला जे कोणी होतं ते त्यांच्या रूमसमोर होतं .आणि बॅटरी दरवाजावर रोखली जमिन आणि दरवाजामधल्या फटीतून बॅटरीचा प्रकाश दिसत होता. दरवाजावर एक जोरदार धक्का बसला आणि दरवाजा उघडला . शशिकलाबाईंच तोंड दरवाजाच्याच दिशेला होते .दरवाजात एक माणूस उभा होता ज्याच्या बॅटरीचा प्रकाश सरळ त्यांच्यावर पडत होता तो माणूस त्यांना बघून जागीच खिळला त्याचा श्वास भीतीने गळ्यातच अडकला . हातातली बॅटरी खाली पडली आणि बंद झाली तो जोरात ओरडला "निघा रं.... इथून ....निघा.... "अस म्हणत तो जिन्याकडे धावला आणि जिन्यावरुन त्याचा धडपडत खाली जाण्याचा आवाज आला .त्याला अस पळताना पाहून हनम्या आणि नाऱ्या सावध झाले .हनम्या हातातली पहार सावरून त्या रूमकडे जाऊ लागला त्या पाठोपाठ नाऱ्याही जाऊ लागला ते दोघेही त्या रूमच्या दरवाजाजवळ आले .आतल द्रुश्य पाहून दोघेही भांभावले हनम्याच्या हातातली पहार गळून पडली दोघांचेही पाय लटपटू लागले .आत एक बाई खुर्चीवर बसली होती तिच्या कपाळाला मोठी खोच पडली होती त्यातून निघणार रक्त तिच्या चेहऱ्यावरुन साडीवर ओघळत होतं, रक्ताने तिचा एक डोळा पूर्ण लाल तर दुसरा पूर्ण सफेद होता ती ह्यांच्याकडेच पाहत होती .ते सर्व पाहून कसेबसे ते दोघे जिन्याकडे धावले जिन्यावरुन धडपडत अंधारात खिडकी गाठली आणि कसबस स्वतः ला बंगल्याबाहेर लोटल .बंगल्यापासून दूरवर त्यांच्या धावत जाण्याचा आवाज येत होता .काहीवेळाने बंगल्यात नीरव शांतता पसरली .शशिकला बाईं पुन्हा झोके घेऊ लागल्या त्यांची नजर पुन्हा आपल्या फोटोवर खिळली काळानुसार त्यावर धूळ जमा झाली होती आणि सर्वात महत्वाच म्हणजे त्या फोटोवरचा चंदनाचा हार जुना होऊन तुटून केव्हाच गळून पडला होता ....

समाप्त

No comments:

Post a Comment