रहस्यकथा आणि भयकथा |भुतांच्या गोष्टी|bhutachya bhayanak katha in marathi

रहस्यकथा आणि भयकथा | bhutachya bhayanak katha| bhutachya satya katha| bhutachya goshti facebook | kokanatil bhutachya goshti| bhutanchya goshti in marathi| bhutachya bhayanak katha in marathi| kokanatil bhoot| horror stories in marathi|भुतांच्या गोष्टी


रहस्यकथा आणि भयकथा |भुतांच्या गोष्टी|bhutachya bhayanak katha in marathi


ताटातूट 
-------------
गायत्रीने डोळे उघडले ,सगळीकडे काळोख होता ,चाचपडतच तिने मोबाईल शोधला ,पहाते तर रात्रीचे दोन वाजले होते ,लाईट गेलेले दिसतात , जवळच तिचा नवरा गौरव तिच्या गळ्यात हात टाकून झोपला होता ,स्वयंपाक घरातून भांड्यांचा आवाज ऐकू येत होता ,एवढ्या रात्री ते सुद्धा काळोखात काय करतात सासूबाई असा विचार तिच्या मनात आला ,अलगद तिने गौरव च्या मिठीतुन स्वतःला सोडवून घेतले , ती बेडरूम मधून बाहेर आली ,सर्वत्र काळोख होता,, आणि किचन मधून येणारा आवाज थांबला ,पण ,,,,,,,,,,किचन च्या दारात पडद्यापाशी कुणीतरी होते ,,,,,,,,आई तुंम्ही काय करताय ????? ती पुढे आली ,,पण ,,,तिथे तिची सासू नव्हती ,,,,,,,,एक काळी सावली ,,,,नाही ,,,,काळा पंजाबी घातलेली ,,,,,केस मोकळे सोडलेली ,,,,,,बापरे हे कोण आहे???चेहरा स्पष्ट दिसतच नाही ,आणि तिने घाबरून किंकाळी फोडली ,,,,,,घरातील सगळे जागे झाले ,,,,तिच्यापाशी जमले ,,,,काय झाले विचारले ,,,,,ती फक्त किचन कडे बोट दाखवत होती ,लाईट आले ,,,,,,किचन मध्ये कोणीही नव्हते ,
गायत्रीचे लग्न होऊन नुकताच एक महिना झाला होता ,ती एम कॉम होती , गौरव एम डी होता ,माणसे सज्जन होती ,त्यांच्या या बंगल्यात सुखाने राहत होती ,आज झालेल्या प्रकाराने गायत्री खूप घाबरली होती ,
गायत्री हाऊसवाईफ होती ,नवीनच लग्न झालेली मुलगी ,,,,,नवीन पदार्थ करायची सासू सासरे नवरा कौतुक करायचे ,गायत्री खूप खुश होती ,
संघ्याकाळची वेळ ती घराभोवती सर्व झाडांना पाणी घालत गुणगुणत होती ,इतक्यात खिडकीतून ,,,,,बापरे तीच काळी सावली ,,,,कुणीतरी रोखून बघते आहे ,तिच्या अंगावर काटा आला ती धावतच घरात आली ,,,,,रडतच तिने सासूला सांगितले ,तिला दोघांनीही समजावले अग घाबरू नको असे काहीही नाही ,तरीही गायत्रीच्या मनातून हे काही जात नव्हते
गौरव तिला नेहमी समजावत असे अग मी मेडिकल ला असताना इतके मुडदे फाडलेत त्यावर अभ्यास केलाय मग तूच सांग माझ्या मागे किती भुते लागली पाहिजेत ?????तो नेहमी खांदे उडून बेफिकीर पणे बोले कधी अचानक तिच्या मागे येऊन तिला घाबरवत असे ,तर सासू सासरे पण सांगत अग असे काहीही नाही,
गायत्रीला सतत घरात भास होत कधी जिन्यावरून कोणी बघत चालले आहे तर कधी फ्रीझ मागे कुणीतरी आहे ,कधी खुर्चीवर कोणीही बसले नाही तरी ती हलत असे एक ना अनेक भास तिला होत असत ,घरातील लोकांना ते पटत नसे ,
अशातच गायत्रीला दिवस गेले सासू सासरे खुश होते तर गौरव तिचे खूप लाड करे सुखाने चिंब भिजलेल्या गायत्रीला एक काळजी पोखरत असे ,,,,,,घरात कुणीतरी आहे ,,,,,,गायत्रीला गुलाबजामून खावेसे वाटले तिने सासूला सांगितले ,,,,,आणि सासू सासर्यांनी स्पष्ट नाही सांगितले ,,,,,,दुसरे काहीही माग पण गुलाबजामून नाही ,गावातच तिची मावशी रहात होती तिने गायत्री साठी गुलाबजामून केले ,गायत्रीने गौरवला ते घेऊन यायला सांगितले ,त्याने आणले ,गायत्रीने डबा बेडरूम मध्ये ठेवला ,तिला रात्री भूक लागत असे म्हणून ,,,,,गौरव हि बायकोचे लाड पुरवत होता ,,,,,,त्या रात्री दोन वाजता तिला कसलातरी आवाज आला ती उठून बसली तर बापरे ,,,,,,ती ,,,काळी सावली खुर्चीवर बसून गुलाबजामून खात होती ,गायत्री जोरात ओरडली ,,,,,गौरव उठला त्याने दिवा लावला ,,,,,गुलाबजामचा डबा खाली पडला होता ,गुलाबजाम विखुरले होते ,ते अर्धवट खाल्ले होते पण ते खाणे मानवी नव्हते ,,,,एखाद्या जनावराने खावे असे होते 
गायत्रीने झालेला प्रकार गौरवला दाखवला इतक्यात सासू सासरे आले त्यांनाही तिने सर्व सांगितले ते बोलले तुला सांगितले होते ना तू गुलाबजामून या घरात आणू नको म्हणून ???त्याबरोबर गौरव बोलला याचाच अर्थ इथे काहीतरी आहे ,,,,,आई बाबा आजपर्यंत मी बायकोला हसत होतो तिची चेष्टा करत होतो ,,,,,गायत्री पण म्हणाली मी इथे राहणार नाही मी माहेरी जाते ,,,,,प्रकरण चांगलेच तापले हे बघून सासरे बोलायला लागले ,,,,,,,
खूप वर्ष झाली या गोष्टीला त्यावेळी मी कॉलेज ला होतो ,पूर्वीची कुटुंब मोठी घरात आठ दहा मुले असायची मोठ्या बहिणी भाऊ लग्नाचे होते मोठ्या बहिणीची लग्ने जमत नव्हती ,माझी लहान बहीण होती, ती खूप गोड होती , माझा मित्र योगेश नेहमी आमच्या घरी येत असे तो मेडिकल ला होता बहीण कॉमर्स च्या पहिल्या वर्षाला होती ,त्या दोघांचे कधी कसे प्रेम जमले मलाच कळले नाही किंबहुना मलाच काय कुणालाच माहित नव्हते ,एके दिवशी तिला उलट्या व्हायला लागल्या आईला कारण समजले बाबानी आईने हिला खूप मारले ,तिने योगेशचे नाव सांगितले पण योगेश परदेशी पुढील शिक्षणासाठी गेला होता ,तिला कोंडून ठेवण्यात आले ,डॉक्टर कडे गेले तर लोकांना समजेल मुलींची लग्ने होणार नाहीत या भीतीपोटी तिला घरगुती औषध दिले आणि त्यातच तिचे निधन झाले ,,,,,लोकांना सांगण्यात आले तिला ताप येत होता ,तिला खूप मारहाण केली उपाशी ठेवले त्यामुळे ती सूडाच्या भावनेने दिसते आहे मला पण दिसते पण आम्ही काय करणार आता ?????सासू बोलली तिला गुलाबजामून खूप आवडायचे त्यामुळे घरात करत नाही केले तर ती खाते ,,,,,गौरव डोके धरून बसला होता ,,,
,,
माझा यावर विश्वासच नाही
सासरे बोलले अरे म्हणूनच तर तुला कायम होस्टेलला ठेवले होते ,मग परदेशी पाठवले
गौरव --आता ते काका कुठे आहेत ???का फसवले त्यांनी आत्याला ???
सासरे --अरे त्यांनी फसवले नाही तो मला नंतर भेटला खूप रडला दोघांचे खूप प्रेम होते त्यांनी आणाभाका घेतल्या होत्या ,तो तिच्याशी लग्न करणार होता ,तो रडत होता मला म्हणंला माझ्या गायनीक होण्याचा काय उपयोग माझ्या प्रेमाला मी मारलं रे
सर्व काही सुन्न करण्यासारखे होते ,
आणि एक दिवस ,,,,,योगेश त्या घरी आला तो भारतात आला होता मित्राला भेटायला आला बोलता बोलता विषय निघाला योगेश बोलला मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो ,मी आजही लग्न केले नाही ,मला तीच आवडत होती ,माझ्या आयुष्यात कितीतरी मुली आल्या पण मी तिला विसरलो नाही ,तो खूप रडत होता
पूर्वीचे लोक खूप कर्मठ होते ते कुठे तरी चुकले त्यांची शिक्षा योगेश भोगत होता ,तर त्याची प्रेयसी मृत्यूनंतरही भोगत होती ,
गायत्रीने योगेश काकांना आग्रहाने ठेऊन घेतले ,ते हि राहिले ,,,,,,
दोन दिवसांनी योगेश सकाळी पेपर वाचत होता गायत्रीने त्याला चहा दिला , ती आत काम करत होती इतक्यात योगेश सोफ्यावरून खाली कोसळला गौरव धावत गेला काकांना तपासले ते वारले होते हार्ट अटॅक आला होता ,
योगेश चे नातेवाईकांना बोलावून त्याचे सर्व विधी पार पाडले होते पण योगेशचे गायत्रीच्या घरी मरणे ,,,,,,,,,किती विचित्र योगायोग होता तो ,,,,,
काही दिवसांनी रात्री दोन वाजताच ,,,,,कसलातरी आवाज झाला ,,,,कदाचित गाणे ,,,,कोण म्हणतंय ?????गायत्रीने गौरवला उठवले ,तो पण उठला आता तो तिची चेष्टा करत नसे तिला सांभाळत असे ,,,,,,बाहेर गाण्याचा आवाज येत होता ,,,,,,गौरवने खिडकी उघडली ,,,,,,बापरे बाहेर दोन काळ्या सावल्या होत्या ते एक कपल होते ,त्यात चक्क योगेशकाका होते हे दोघे हातात हात घालून गाणे म्हणत होते ,
नाही कळले कधी
जीव वेडावला
ओळखू लागलो
मी तुला तू मला ,,,,,,आणि ते दोघे दूर दूर जाताना दिसले ,,,,,,गायत्रीने समाधानाने निश्वास सोडला ,,,,, 

No comments:

Post a Comment