एक स्त्री पुढे स्कूटरवर होती jokes

पुण्याच्या टिळक रस्त्यावरून, बाईक वरून जात होतो.
एक स्त्री पुढे स्कूटरवर होती.
अचानक ती उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याला वळली ( अर्थात इंडिकेटर किंवा हात न दाखवता).
मी तिला धडकलो.
तिला म्हणालो ...." अहो कमीतकमी हात तरी दाखवा, उजवीकडे वळताना".
तर ती म्हणाली, " त्यात काय हात दाखवायचा ?...
मी रोजच इकडे वळते".