खरचं लोकांची मानसिकता कुठे चालली आहे

खरचं लोकांची मानसिकता कुठे चालली आहे...
साईंच्या देवळात
गेलो होतो... दर्शन घेऊन बाहेर आलो न् समोरच्या ठेल्यावर उसाचा रस घेत होतो,
तिथेच बाजूला हाराच् दुकान पण आहे...
एक चांगला पस्तिशीचा इसम तिथे आला..
त्याने अगदी 250 चा सुन्दर हार घेतला...
तेवढ्यात त्याच्या कड़े एक गरीब मुलगा आला,
याच त्या मुलाकडे लक्ष नव्हतं.. तशी काही गरज पण नव्हती... 11 वर्षाचा असेल तो मुलगा... त्याने त्या इसमाच्या हाताला स्पर्श
केला तो त्याने त्याच्या कड़े पाहिले आणि अगदी दूर ढकलत, स्वतःचा हात रुमालाने पुसला...
पण तो मुलगा अगदी रडवा चेहरा करुन् त्याच्या कड़े पाहत होता, त्याचे डोळे पाणावलेले होते आणि तो पैसे मागत नव्हता...
तर 1 ग्लास उसाचा रस त्याच्याकडे मागत होता...
तहान लागली आहे बोलत होता..☘
पण त्या इसमाला काही पाझर फुटला नाह.
ते पाहुन, मी रस वाल्याला सांगितले,
त्या मुलाला रस दे, पैसे मी देतो...
तो मुलगा रस प्यायला आणि माझ्या कड़े क्षणभरचं पाहिलं.. एक स्मित हास्य आणि पळाला...
तहान भागल्याच् सुखं त्याच्या
कोवळ्या चेहऱ्यावर स्पष्ट जानवलं...
तोवर या इसमाचा ego दुखावला होता...
तो मला बोलला..
"आप जैसे लोग इन भिकारियों को सर चढ़ाते हो..."
मी त्याला बोट दाखवलं... तो मुलगा पुढे जाऊन मंदिराचे जीने पुसतं होता...
एवढच बोललो...
"आपको साईं के मूर्ती में
भगवान् दिखता है, जिसके लिये आपने 250 का हार लिया..
और मुझे उस बच्चेके हँसी में साईं मिल गए..
आपका भगवान् 250 में भी नहीं हँसा,
लेकिन मेरा साईं 10 रूपयों में हँस दिया..."
माहित नाही मित्रांनो.. पण हे लिहिताना देखिल माझे डोळे पाणावले...
कुठे आहे माणुसकी...?
कुठे चालली आहे भक्ति..?
जो साईं जिवंत असताना, भिक्षा मागून आणायचा आणि ती देखिल वाटून खायचा
त्या साईंच्या भक्तांना त्यांचा साधा आदर्श देखिल पाळता येऊ नये...??
हि कसली भक्ति..? ज्याची भक्ति करता त्याचे विचार तुमच्या वर्तवणुकित नसतील,
तर कसली आलिये भक्ति...
☘काय उपयोग त्या पैशांचा ज्याने एखादा गरीब हसू शकतं नसेल...
❇तासाभरासाठी मूर्तिच्या गळ्यात हार टाकून, काय सिद्ध
केल त्याने...?
दान पेटित पैसा टाकला देवासाठी, पण पोचला बिनकामाच्या  अकाऊन्टलाना... 
स्वतःच्या ऐश्वर्याच् प्रदर्शन कशासाठी...???
हा मॅसेज फक्त पाच गृपमधे पाठवा काही जादु बिदु होनार नाही. एक चांगला विचार पसरवल्याचं समाधान मिळेल 
