दादा कोंडके गाणी | दादा कोंडके मराठी गाणी |मराठी गाणी

1)अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान

दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
हादरली ही धरणी, थरथरले आसमान

लक्ष्मणा आली मूर्च्छा लागुनिया बाण
द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
तळहातावर आला घेऊनी पंचप्राण

सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण

हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान

आले किती, गेले किती, संपले भरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
धावत ये लवकरी, आम्ही झालो रे हैराण

धन्य तुझे रामराज्य, धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा ?

घे बोलावून आता कंठाशी आले प्राण
2)काय सखू ?
बोला दाजिबा !

काय सखू, बोलू का नगू,
घडिभर जरा थांबशील का ?
गोडगोड माझ्याशी बोलशील का ?

काय सांगू बाई, लई मला घाई
दाजिबा बोलायला येळच नाही !

येळच नाही ?
दाजिबा थांबायला येळच नाही !

डोईवर घेऊन चाललीस काई ?

डोईवर पाटी, पाटीत भाकरी, भाकरीवर तांब्या
तांब्यात दूध हाय गाईचं, घेता का दाजिबा वाईचं ?

काय सखू, रागावू नगू,
घडीभर जरा थांबशील का ?
थांबशील का , जातीस कुठं तू सांगशील का ?

रानाच्या वाटं घेताय भेट
दाजिबा तुमचं वागणंच खोटं

वागणंच खोटं ?
पहाटेच्या पारी तू चाललीस कुठं ?

पहाटेच्या पारी, घेऊन न्यारी, बाई लौकरी,
जाते मी पेरुच्या बागात, येऊ नका दजिबा रागात

काय सखू, घाबरू नगू,
घडीभर जरा थांबशील का ?
मनात काय तुझ्या सांगशील का ?

सांगू कशी मी कस्कसं होतं
मनात माझ्या भलतंच येतं

काय सखू तुझ्या मनात येतं ?

दुखतंय कुठं कळंना नीट, लाज मला वाटं
दाजिबा तुम्हाला माहीत, जायाचं का आंबराईत ?

चल चल सखू, चल सखू
जावा दाजिबा, अहो जावा दजिबा !3)चल रं शिरपा, देवाची किरपा
झालीया औंदा छान रं छान
गाऊ मोटं वरचं गानं

चल माज्या राजा, चल रं सर्जा बिगी बिगी
बिगी बिगी डौलानं, डौलानं
गाऊ मोटं वरचं गानं

मोट चालली मळ्यात माज्या, चाक वाजतंय कुईकुई
पाटाचं पानी, झुळझुळवानी, फुलवीत जातंय जाईजुई
धरती माता, येईल आता, नेसून हिरवं लेनं रं लेनं
गाऊ मोटं वरचं गानं

गाजर मुळा नी केळी राताळी माघातला हरभरा
पडवळ काकडी वांगि वालपापडी मक्याचा डुलतोय तुरा
कोथमिर घेवडा सुवासी केवडा उसाचं लावलंय बेनं रं बेनं
गाऊ मोटं वरचं गानं

उसाचं पीक आलंय जोसात औंदा
अरं देईल बरकत मिरची नी कांदा
वाटाना भेंडी तेजीचा सौदा
खुशीत गातुया शेतकरी दादा
गव्हाची ओंबी वार्याशी झोंबी करतीया पिरमानं पिरमानं
गाऊ मोटं वरचं गानं4)झाल्या तिनी सांजा करुन सिणगार साजा
वाट पहाते मी येणार साजन माझा

प्रीतीच्या दरबारीचं येणार सरदार
मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार
दिलाच्या देव्हार्यात बांधीन मी पूजा
वाट पहाते मी येणार साजन माझा

भेटीत रायाच्या सांगेन मी सारं
सोसवेना बाई मला यौवनाचा भार
तान्हेल्या हरणीला हळूच पाणी पाजा
वाट पहाते मी येणार साजन माझा

त्यांच्याच ओठांचा ओठी रंग लाल
आठवणीने त्यांच्या बाई रंगले हे गाल
धुंद व्हावी राणी, रंगून जावा राजा
वाट पहाते मी येणार साजन माझा

वाटतं सख्याचं वाजलं पाऊल
खट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल
घालू कशी मी साद होईल गाजावाजा
वाट पहाते मी येणार साजन माझा

इचारच पडला बिचार्या मनाला
येळ का व्हावा बाई सख्या सजनाला
बिलगुन बसावी शंभूला सारजा
वाट पहाते मी येणार साजन माझा

5)माळ्याच्या मळ्यामधी कोण उभी
राखण करते मी रावजी,
रावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी

औंदाचं वरीस बाई मी सोळावं गाठलं
चोळी दाटली अंगाला बाई कापड का फाटलं
काळीज माझं धडधड करी, उडते पापणी वरचेवरी
रावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी

नार गोमटी तू देखणी ठुसका बांधा ठसला मनी
फुलराणी जीव माझा साजणी जडला तुझ्यावरी
रावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी

माळ्याच्या मळ्यामधी कोण उभी
वांगी तोडते मी रावजी,
रावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी

गोर्या गालावरी माझ्या लाली लागली दिसू
अंघोळीला बसले, माझं मलाच येई हसू
पदर राहिना खांद्यावरी पिसाट वारं भरलं उरी
रावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी

शुक्राची तू चांदणी, लाजू नको नाही कुणी
मंजुळा, जीव तुझ्यावर खुळा झाला खरोखरी

माळ्याच्या मळ्यामधी कोण उभी
वांगी तोडते मी रावजी,
रावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी

6)हिल, हिल पोरी हिला, तुझ्या कप्पालिला टिला
तुझ्या कप्पालिला टिला, फॅशन मराठी सोभंय तुला

आरं जा जा तू मुला, का सत्तावितंय मला
का सत्तावितंय मला, जाऊन सांगेन मी बापाला

धाकू पाटलाची पोर मी बेरकी, अशी किती पोरं तुझ्यासारखी
आरं जेवण करायला, पाणी भरायला, ठेवीन घरकामाला

तुझी फॅशन अशी रे कशी, लांब कल्ले तोंडात मिशी
तू डोळ्यानं चकणा, दिसं नाही देखणा, चल जा हो बाजूला

तुझा पदर वार्याशी उडतो, अग बघून जीव धडधडतो
तुझी नखर्याची चाल, करी जिवाचं हाल, माझे गुल्लाबाचे फुला

दादा कोंडके

कृष्णराव आनंदराव कोंडके उर्फ दादा कोंडके

ऑगस्ट १९३२ ते १४ मार्च १९९८

शेवटचा पत्ता: रमा निवास, शिवाजी पार्क मुंबई.

दादा कोंडके - नाव घेताच नाक मुरडायची आपल्याकडे काही लोकांची फॅशन आहे. अतिसाधारण चेहरा, अगदी माथाडी कामगारांसारखा अवतार, कंबरेला लटकणारी हाफ-चड्डी आणि किंचित अस्पष्ट आवाजातले द्विअर्थी संवाद याहून वेगळी अशी ओळख लोकांना नसते, आणि त्यांना ती तशीच ठेवायची असते. दादांचा जन्म लालबागचा, गिरणी-कामगाराच्या पोटी. ऑगस्ट, १९३२ रोजी, गोकुळाष्टमीच्या शुभप्रसंगी लाभलेल्या या पुत्र'रत्ना'चे कृष्णा म्हणून नामकरण करण्यात आले. पोरक्या वयातच या कृष्णाच्या लीला उसळून बाहेर येऊ लागल्या. शाळकरी वयातच त्यांना गल्लीतले 'दादा' म्हणून ओळखले जात असे. ही 'बिरुदावली' नंतर कायम राहिली. जेष्ठ बंधूंच्या अपकाली निधनामुळे घर सांभाळायची जबाबदारी आली. 'अपना बाजार' मध्ये दरमहा साठ रुपयाने कामावर असतानाच दादा सेवा-दलाच्या बँडमध्ये काम करू लागले. कलेचा नाद शांत बसू देईना, म्हणून प्रसिद्ध गाण्यांची विडंबने करणे, विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे फावल्या वेळेतले छंद त्यांनी जोपासले. सेवा दलात असतानाच त्यांची गाठ निळू फुले, राम नगरकर यांच्याशी पडली. आणि सेवा दलाच्या नाटकांत दादा छोटी-मोठी कामे करू लागले.

पथ-नाट्यात आपल्या विनोदाच्या टाईमिंगवर हशा उसळवणाऱ्या दादांचे प्रसिद्ध होणे त्यांच्या सेवा-दलातील साथीदारांना पाहवले नाही. 'खणखणपुरचा राजा' मधील गाजणारी भूमिका सोडून, सेवा दलातून फारकत घेत दादांनी स्वतःचा फड उभारला आणि शाहीर दादा कोंडके वसंत सबनिसांच्या 'विच्छा माझी पुरी करा' नाटकातून पुन्हा रंगभूमीवर उतरले. दादांच्या आयुष्यातील हे वळण दादांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या भविष्यावर फार मोठे उपकार करून गेले. दादांनी परत मागे वळून कधी पाहिलेच नाही. 'विच्छा'चे १५०० हून अधिक प्रयोग झाले. आणि दादांसारखे रत्न भालजी पेंढारककरांसारख्या पारख्याच्या नजरेत पडले. पेंढारकरांनी दादांना 'तांबडी माती' या चित्रपटात पहिला ब्रेक दिला. चित्रपट चालला नाही, पण दादांवर चित्रित झालेल्या एकमेव गाण्यात 'डौल मोराच्या मानंचादादांनी बाजी मारली. आणि दादांनी स्वतः चित्रपट निर्मितीत उतरायचे ठरवले. सदिच्छा पिक्चर्स आणि कामाक्षी पिक्चर्सने इंडस्ट्रीत पाऊल टाकले. लालबागमध्ये बालपण घालवलेल्या आणि नंतर सेवादलातून गावोगाव फिरलेल्या दादांना एव्हाना सर्वसामान्य जनतेला काय आवडतं, याची चांगलीच कल्पना आली होती. 'विच्छा' मधील द्विअर्थी संवादांतून प्रेरणा घेऊन दादा मैदानात उतरले असले, तरी पहिला चित्रपट 'सोंगाड्या' मात्र अगदी निरागस होता.

जून १९७१, 'सोंगाड्या' प्रदर्शित झाला. सोंगाड्याला सुरुवातीला सिनेमागृह मिळत नव्हते. बाळासाहेब ठाकरेनी सोंगाड्याला सिनेमागृहाची सोय करून दिली आणि सोंगाड्या तुफान गाजला. इतका की बऱ्याच सिनेमागृहांनी जेमतेम चालत असलेला देव आनंदचा 'तेरे मेरे सपने' उतरवला आणि सोंगाड्या लावला. महाराष्ट्राने सोंगाड्या डोक्यावर उचलून घेतला. खुद्द दादा कोंडके मिळालेल्या अभूतपूर्व यशाने भारावून गेले होते. मिळालेल्या लोकप्रियतेचा पुरेपूर वापर करून घेत दादांनी लगेच पुढल्या चित्रपटाची घोषणा केली आणि बॉलिवूडचे धाबे दणाणले. ७२ साली 'एकटा जीव सदाशिव' प्रदर्शित झाला. या चित्रपटाची हाईप इतकी झाली होती, की खुद्द राज कपूरने आपल्या पोराला (ऋषी कपूर) लाँच करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आणि 'बॉबी' पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. असे म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना 'एकटा जीव सदाशिव' उतरवण्याची विनंती करायला लागली होती. बॉबी गाजलाच, पण त्यामागोमाग आलेल्या 'आंधळा मारतो डोळा'ने लाईम-लाईट पुन्हा दादा कोंडकेंवर आणली. दादा १९७५ मध्ये पांडू हवालदारच्या रुपात पुन्हा पडद्यावर आले आणि सुरु झाली दादा विरुद्ध सेन्सॉर बोर्ड अशी खुली जंग. अर्थातच आता मागे वळून पाहताना दादा त्यांना किती भारी पडले, ते दिसतंच.

ठराविक टीम हे कामाक्षी पिक्चर्सचं वैशिष्ट्य म्हणता येईल. अभिनेत्री उषा चव्हाण, पटकथा लेखक राजेश मुजुमदार, संगीतकार द्वयी राम-लक्ष्मण, पहिले जयवंत कुलकर्णी मग महेंद्र कपूर मुख्य गायक आणि उषा मंगेशकर मुख्य गायिका. दादांच्या सतत यशामागील सुसूत्रता यातून स्पष्ट होते. दादांच्या गाण्यांबद्दल वेगळा एक लेख, कदाचित एखादी लेखमालिका होऊ शकेल.

पांडू हवालदार मध्ये दादांनी 'अशोक सराफ' या उमद्या कलावंताला संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते. मुंबई पोलिसांचा हा हवालदार box office वर MI6 च्या एजंटला भारी पडला. पांडू हवालदारमुळे मुंबईत MGM ला The Man With The Golden Gun लावायला सिनेमागृहे मिळेनात. कधी नव्हे ते जेम्स बॉंडचा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप गेला. त्याचबरोबर दादांचा आलेख मात्र चढत गेला.

तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथं गुदगुल्या, ह्योच नवरा पाहिजे आणि 'तेरे मेरे बीच में' हे सिनेमे प्रदर्शित झाले आणि आपल्या पहिल्याच हिंदी सिनेमानंतर दादांनी थेट गिनीज बुकात एन्ट्री मारली. आल्फ्रेड हिचकॉकचा सलग आठ चित्रपट रौप्य-महोत्सवी असण्याचा रेकॉर्ड तुटला आणि तिथे वर्णी लागली दादा कोंडके यांची. इतकं होऊनही दादा कोंडकेंना तथाकथित पांढरपेशा समाजाने कधी स्वीकारले नाही. इंग्रजी सिनेमांतील उत्तांग प्रणयदृश्ये शौकीने पाहणाऱ्या पांढरपेशा समाजासाठी, स्त्री-पुरुष यांच्या नैसर्गिक संबंधांतले गांभीर्य विनोदातून साकारणारे दादा कायम अश्लीलच राहिले. दादांनीही या वर्गाला मग जणू फाट्यावरच मारले. दादा म्हणायचे की मी किती जरी उत्तम सिनेमा बनवला, तरी उच्चवर्गीय तो फक्त एकदा बघणार, बरी-वाईट प्रतिक्रिया देणार आणि विसरून जाणार. त्यापेक्षा मी असे सिनेमे का बनवू नये की जे एखाद्या श्रमिकाने चार वेळा पाहावेत आणि आपला रोजचा ताप-ताण विसरून मनसोक्त हसावे. दादांचा सिनेमा 'मास'साठी होता, एखाद्या विशिष्ट 'क्लास'साठी नव्हे.

याच दरम्यान दादा बाळासाहेबांच्या आणि पर्यायाने शिवसेनेच्या खूप जवळ आले होते. शिवसेनेच्या प्रचारसभेत त्यांनी केलेली भाषणे आजही ऐकताना हसून हसून डोळ्यात पाणी येते. शिवसेनेने दादांच्या प्रभावाने बरीच माणसे खेचली. आंध्रात याच कालखंडात झालेल्या निवडणुकांत १९८२ साली एन.टी. रामाराव यांनी सत्ता काबीज केली होती. राजकारणात यामुळेच दादांचे लक्ष वेधले गेले आणि नुसते प्रचारक राहता दादांनी सक्रीय राजकारणात उतरायचा प्रयत्न केला.

दादा सर्वसामान्यांत सर्वसामान्य बनून राहिले. मुंबईत अथवा बाहेर कुठेही त्यांच्या वावरण्यात कधी गर्व प्रकटला नाही. "जर मी एखाद्या स्टारसारखा वागू लागलो, तर मला आरशात स्वतः कडे पहायची लाज वाटेल. मी सामान्य माणूस म्हणून जन्माला आलो, सामान्य म्हणूनच जगणार", अशा शब्दांत दादा त्यांचे मत मांडायचे. दादांना रेडिओवरील एका कार्यक्रमात विचारणा केली गेली होती की दादा टीव्ही वर कधी येणार म्हणून. दादांचे उत्तर होते, जेव्हा अमिताभ बच्चन येईल त्यानंतर. पूर्ण इंडस्ट्रीने आणि खुद्द अमिताभने त्यांची यावरून खिल्ली उडवली. आज वास्तव हे आहे की दादा कधीच आले नाहीत, पण अमिताभ आला. आणि ते देखील हात मागे बांधून आला. आज जर दादा कोंडके हयात असते, तर आजच्या सिनेमांत-टीव्हीवर चाललेला नंगा-नाच पाहून त्यांनी जनतेला खुल्ला विचारलं असतं की "तुमच्या मायला, तुमची 'अश्लील'ची नेमकी व्याख्या तरी काय आहे?"
दादांचे एक वाक्य, "माझ्या दृष्टीने लोकांना रडवणे हे पाप आहे. प्रेक्षक त्यांच्या वैक्तीक जीवनात कुठल्या ना कुठल्या कारणाने त्रासलेले असतातच. अशा परिस्थीतीत माझ्या चित्रपटाद्वारे अडीच तास तरी त्यांना त्यांच्या विवंचना विसरता यायला हव्यात असे मला वाटतं. त्यांना हसवण्याचा प्रयत्न मी केला आहे. थिएटर मध्ये माझे चित्रपट बघतांना प्रेक्षकांना मनमुराद हसतांना बघितलं की मला जो आनंद होतो, त्यचं वर्णन मी शब्दात करू शकत नाही. 'विच्छा' पासून मी प्रेक्षकांना हसवायचा वसा उचलला आहे आणि मरेपर्यंत मला तो चालवायला हवा, तरच माझं जीवन सफल झालं असं मी मानेन"

१४ मार्च १९९८ रोजी, वयाच्या अडूसष्टव्या वर्षी दादांचे हृदय-विकाराने निधन झाले. आयुष्याच्या अखेरीस दादा खूप एकटे पडले होते. त्यांच्या आत्मचरित्रात ते म्हणतात, "देवा, पुढल्या जन्मात मला पैसा नको, प्रसिद्धी नको, ऐषाराम नको. फक्त माझी म्हणता येतील अशी चार माणसे दे."
दादा कोंडके यांचे चित्रपट

. सोंगाड्या १९७१ हा पहिला चित्रपट. कृष्णधवल स्वरूपात. सुवर्णमोहोत्सवी (दादा चाळीशी पार करून गेले होते या वेळी)

. एकटा जीव सदाशीव १९७२ कृष्णधवल

. आंधळा मारतो डोळा १९७३ कृष्णधवल

. पांडू हवालदार १९७५ कृष्णधवल

. तुमचं आमचं जमलं १९७६ रंगीत

. राम राम गंगाराम १९७७

. बोट लावीन तिथं गुदगुल्या १९७८

. ह्योच नवरा पाहिजे १९८०

.आली अंगावर १९८२

१०. मुका घ्या मुका १९८६

११. मला घेऊन चला १९८९

१२. पळवा पळवी १९९०

१३. येऊ का घरात? १९९२

१४. सासरचं धोतर १९९४

१५. वाजवू का? १९९६

हिंदी

१६. तेरे मेरे बिच मे १९८४

१७. अंधेरी रात मे दिया तेरे हाथ में १९८६

१८. आगेकी सोच १९८८ (शक्ती कपूर सोबत)

१९. खोल दे मेरी जुबान १९८९ (मेहेमूद सोबत)

गुजराथी

२०.नंदु जमादार १९७७

२१.राम राम आमथाराम १९७९