1000+ पावसाची गाणी |गाणी पावसाची |प्रेमाचा पाऊस 2016 best गाणी


बालपणीच्या आठवणी मध्ये मन गुंतून जाते. पावसाची सुरवात व्हायच्या आधीच पावसाची गाणी सुरु होतात. हा पाऊसही लहान मुलासारखा निरागस असतो. तो कधीच भेदभाव करत नाही. शाळेतून घरी परतताना मध्येच पावसाने गाठलं तरी, एखाद्या झाडाखाली उभं न राहता त्या पावसाच्या सरीमध्ये भिजत घरापर्यंत चिखल तुडवत जायला खूप मजा येते घरी आल्यावर आईचा मार खावा लागतो, पण चिंब भिजल्याने जो आनंद मिळतो त्यापुढे आईचा मार काहीच वाटत नाही. बाई वर्गात शिकवत असतात आणि आपण त्याच्या येण्याची वाट बघत असतो. एकदा तो आला मग काय मजाच मजा वर्गात फक्त दंगा करायचा. शिकवणीला सुट्टी म्हणूनच पाऊस आणि बालपण याचं अगदी जीवाभावाच नातं असतं.1)पावसाळा
गोल गोल रानी
ईत्ता ईत्ता पानी
पावसाची गाणी
कित्ती गोड
येरे ये पावसा
तुला देतो पैसा
व्यवहार ऐसा
जिव्हाळ्याचा
बालपणी किती
पावसाची गोडी
पाण्यावर होडी
कागदाची
इंद्रधनु संगे
श्रावणाच्या सरी
कोवळ्या दुपारी
आकाशात
चातुर्मासामध्ये
सणवार किती
पारायण, पोथी
घरोघरी
मंगळागौरीचा
उत्साहाचा सण
येतसे उधाण
आनंदाला
नागपंचमीला
झाडावर झुले
झुलतात मुले
फांद्यावरी
बाहुला बाहुली
काचेच्या त्या गोटय़ा
कधी आटय़ापाटय़ा
अंगणात
रक्षाबंधनाच्या
आठवणी गोड
बहिणीला ओढ
माहेरची
येथे नवरात्र
तेथे गणपती
कार्यक्रम किती
मंडळांचे
मुक्या जिवांनाही
लावतात लळा
त्यांच्यासाठी पोळ
भरतोय
अंगावर झूल
रंगलेली शिंगे
सर्जाराजा संगे
घरधनी
गोविंदांची धूम
गोपालांच्या झुंडी
उंच दहीहंडी
बांधलेली
मनोऱ्यावरती
मनोरे चढती
तरीही फोडती
कौशल्याने
शंभू, महादेव
हर बोला गाणी
ओततात पाणी
पिंडीवर
जलाभिषेकाची
जय्यत तयारी
ते कावडधारी
सज्ज सदा
आषाढ पौर्णिमा
चंद्रभागे तीरी
पंढरीची वारी
ठरलेली
दसरा, दिवाळी
सण मोठा मोठा
आनंदाला तोटा
नाही तेथे
असा पावसाळा
रम्य भारतात
होते बरसात
सुखाचीच
हिरवी कोवळी
गवताची पाती
दवबिंदू मोती
वाटतात
मोराचा पिसारा
फुलतो रानात
ऋतू हा मनात
चिंब ओला
रान मोहरते
पीक बहरते
अंग शहारते
नदीचेही
चिमण्या चोचींना
कोवळे ते दाणे
पाखरांचे गाणे
गोड गोड
पावसाचे पाणी
निसर्गाचे दान
होते रममाण
सृष्टी सारी
पाऊस जीवन
पाऊसच श्वास
म्हणोनिया आस
पावसाची
तोच देतो आम्हा
मातीतून मोती
सुगीचा सोबती
पावसाळा
वरुण राजाची
राहो नित्य कृपा
देवा मायबापा
लक्ष ठेव
‘सखा’ म्हणे ऐका
सांगे बळीराजा
ऋतूंचा हा राजा
पावसाळा

3)पावसाची रिपरिप सकाळपासून सुरूच आहे..
कोण जाणे रंगोलीच्या भागातही पावसाची गाणी
कुणाला तो त्रासदायक तर कुणाला तोच आनंददायी
पाणी हवे तर आहे पण ते अधिक तेवढे मोल कमी
आजच्या पावसाने सुरवात केली ती उत्तम आणि सुरेख
भिजवून टाकली जमीन आणि पिकांनाही दिला ओलावा..
जमीनीची ता गरज माणसाला धान्याची गरज भागविणारा
आजच्यासारखा पाऊस भाद्रपद महिन्यात पडत राहाणार
पावसाची ही तृप्त धरा..वनानवात रानारानातही बहरावी..4)झाडे पाने ती ओलेति
फुले पाकळ्या डोलती
हिरव्या त्या ओठांवरी
मोती टप्पोरं गळती ||
दाही दिशांनी व्यापिले
कण कण शहरले
चिंब पावसाने सारे
नव्चैतन्य हासले ||
मोर नाचती अंगणी
चहूकडे झाले पाणी
सहज आले माझ्या मनी
गाऊ पावसाची गाणी
गाऊ पावसाची गाणी ||

5)एकदा तरी पावसात भिजून बघ
थंडगार ओले थेंब पिऊन बघ
नभातून मेघ वेडा कडाडेल जरी
त्याच्याकडे खट्याळसे हसून बघ
...एकदा तरी पावसात भिजून बघ...!!
मेघातल्या तालामधे ताल मिसळून
विजेतून झरू पाहे वीज-मेघ धून
मिलनाच्या समेवर टाळी तू देऊन
चंचलश्या धारांसवे नाचून बघ
...एकदा तरी पावसात भिजून बघ...!!
खोल आत मनामधे झिरपु दे पाणी
ओठांवर खुलू देत राणी गोड-गाणी
ऐकण्यास आसपास नसेलच कुणी
पावसाची गाणी स्वतःस गाऊन बघ
...एकदा तरी पावसात भिजून बघ...!!
प्रेमवेड्या भाविकांची जत्रा भरेल
नदी मग पावसाला भेटण्या सजेल
सैरभैर झालेल्या त्या पावसाचे मग
मैत्रीण होऊन गुपित जाणून बघ
...एकदा तरी पावसात भिजून बघ...!!
पाऊस हळूच मग जाईल विरून
नखशिखान्त टाकेल तुज भिजवून
प्रियकर वेडावेल पाहून असे ते
दर्पणात रूप तुझे न्याहाळून बघ
...एकदा तरी पावसात भिजून बघ...!!6)"पाऊस"
कधी तू वर्गात बसून
बाहेर धो-धो पडणारा पाऊस पहिलायस,
असा एक तरी दिवस तू 
शाळा सुटल्यानंतर पावसात भिजायचा राहिलायस.
कधी शाळेला जाताना तू
चिखलात पाय घसरून पडलायस,
आणि मग शाळा बुडेल म्हणून
खूप खूप रडलायस.
तो पाऊस कधी
मनात साठवून ठेवलायस,
त्या पावसाला कधी
आठवण्याचा प्रयत्न तू केलायस.
आतासुद्धा पाऊस
खूप धो-धो पडतो,
पण रस्त्यावरून जाताना
पाय घसरून पडता येत नाही.
आतासुद्धा पाऊस
खूप धो-धो पडतो,
पण शाळेत जावून
पावसात भिजत येत नाही.
आता फक्त राहिलेत
ती पावसाची गाणी
अन डोळ्यांत साचलेले
ते आठवणींचे पाणी.
- संतोष सावंतHere is the most famous paus kavita ,  rain poem in marathi ,पाऊस कविता,मराठी निबंध पावसाळा ,पावसाची गाणी 2016