आजी-आजोबा, कॉम्प्युटर मधून नातवंडांना मराठी शिकवा

आजी-आजोबा, कॉम्प्युटर मधून नातवंडांना मराठी शिकवा
आपल्या नातवंडांना आजी-आजोबा कॉम्प्युटर मधून मराठी शिकवू
शकतात.

होय, हे आम्ही घडवले आहे आणि मोफत उपलब्ध केले आहे.

त्याचे नाव आहेशिशुविहार’.

आजी-आजोबांना कॉम्प्युटरची भिती वाटायला नको.

केवळ फाईलवर क्लिक करा.

त्या फाईल्स मध्ये नातवंडांसाठीकमळ’, ‘बदक’, ‘अननसअशी
चित्रे दिली आहेत.

तुम्हाला त्या फाईलीतल्या केवळ ठराविक ठिकाणीच जाता येईल.

तेथे आम्ही फॉण्ट आधीच सिलेक्ट केलेला असतो.

त्याच बरोबर शेजारी कोणती चावी दाबावी ते दिलेले असते.

 ‘k’ दाबले कीकमळ’,  ‘b’ दाबले कीबदक’ ‘a’ दाबले कीअननसपूर्ण शब्द आपोआप उमटतो.

असे अनेक तक्ते दिले आहेत. त्यातून नातवंडांना शिकवताना आजी-आजोबा ही कॉम्प्युटर मध्ये
मराठी टायपिंग शिकतात. बोबडे बोलायला यायच्या आधीच संगणकाशी मराठीतून नातवंडांची
दोस्ती होते.

लहानपणापासूनच मुलांनासंगणक = मराठीहे
समिकरण मनात ठसते.

नंतर त्यांनाजलद सोप्पी मराठीसहजतेने वापरता येते.

यामुळे आता पुढील पिढीला मराठी बोलता आणि लिहीता-वाचता
नक्की येईल.

मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हीशिशुविहारजगाला, आमच्या

वेबवरून मोफत उपलब्ध केले आहे.

No comments:

Post a Comment