link ads

वजाबाकी करण्याची एक ट्रिक

आज आपण वजाबाकी करण्याची एक ट्रिक शिकणार आहोत.  चला तर मग जाणून घेऊया याविषयी सविस्तर:

अनेकवेळा दुकानात / भाजी,फळे ,तिकिट  घेताना  १०० , १००० ची नोट दिल्यावर किती पैसे परत मिळायला हवेत याचे गणित करायला ही ट्रिक आपल्यालाही उपयुक्त .

🔶 10, 100,1000, 10000 अशा संख्येतून कोणतीही संख्या कशी वजा करायची 🔶

उदा: आपल्याला 1000- 674 वजा करायचे?
यासाठी आपणाला पहिले दोन अंक 9 मधून वजा करून घ्यायचे व शेवटचा अंक 10 मधून वजा करून घ्यायचा.

म्हणजेच 9-6 =3
            9-7 = 2
          10- 4= 6
तुमचं उत्तर तयार= 326

आपण आणखी एक उदाहरण पाहू.

10000 - 4328=?

सुरुवातीला
9-4=5
9-3=6
9-2=7
10-8=2

तुमचं उत्तर तयार आहे- 5672

उदा:3)100000-66758
सुरुवातीला
9-6=3
9-6=3
9-7=2
9-5=4
10-8=2

*स्पर्धा परीक्षेत जलद उत्तर काढण्यासाठी ही ट्रिक उपयोगी पडेल* यात शंका नाही.

मनोरंजनातून गणित हा उद्देश तसेच गणित विषयक गोडी लावण्यासाठी अशा प्रकारच्या tricks चा अध्यापनात वापर होणे आवश्यक.

अशाप्रकारे मुले संख्यांची जलद गतीने वजाबाकी करू शकतील.

text and image

Popular posts from this blog

मराठी कोडी | Whatsapp marathi kodi and answer

1000+nepali shayari in nepali images font|nepali shayari in nepali words|Nepali Shayari Love Shayari

1000+ Hindi Shayari Image,Hindi Love Shayari SMS with Images